Tuesday, 20 December 2016

डेअरी फार्मिंगच्या सर्व समस्यांवरील उत्तर, स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस

डेअरी फार्मिंगच्या सर्व समस्यांवरील उत्तर, स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस

देशभरातील डेअरी फार्मिंग उद्योगांचा मित्र

समविचारी आणि ध्येयाने प्रेरित झालेले तरुण एकत्र आल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस... स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिसचे संस्थापक असलेले पाच मित्र त्यांच्या वयाच्या तिशीत विप्रो टेक्नॉलॉजिसमध्ये नोकरीच्या निमित्ताने एकत्र आले. तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे “आता नाही तर कधीच नाही”. तेव्हाच बाहेर पडून लगेचच काहीतरी भन्नाट करण्याचे त्यांनी ठरवले.
पाचही मित्रांमध्ये अनेक चर्चा झाल्या. या चर्चांनंतर जीवनमान उंचावण्याच्या क्षेत्रात काहीतरी करायला हवं, यावर स्टेलॅप्सच्या पाचही संस्थापक मित्रांचे एकमत झाले. तंत्रज्ञानात बुद्धिमान असलेल्या या सगळ्यांनी मग शेती आणि आरोग्याच्या क्षेत्राशी संबंधित उद्योग उभारण्याचा निश्चय केला. साधारण 2011च्या एप्रिलमध्ये या कल्पनेने मूर्तरुप धारण करत स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंदणी करण्यात आली. सध्याच्या घडीला स्टेलॅप्स ही भारतातील एकमेव डेअरी तंत्रज्ञान सोल्यूशन कंपनी म्हणून नावारुपाला आलेली आहे. स्टेलॅप्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत क्लाऊड टेक्नॉलॉजीचा वापर करुन डेअरी उद्योगासाठीचे ऑटोमेशन टूल्स, मोबॅलिटी, डेअरी उद्योगांसाठीचे डेटा ऍनॅलिटिक्स विकसित केले आहे. डेअरी फार्म, सहकार तत्त्वावरील डेअरी उद्योग आणि खाजगी डेअरींसाठीही स्टेलॅप्सने विकसित केलेले तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरत आहे.
स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिसने विकसित केलेले एकात्मिक मिल्क पार्लर
स्टेलॅप्स टेक्नोलॉजिसला ओम्निवोर पार्टनर्सकडून निधी मिळाला आहे. डेअरी टेक्नॉलॉजिसचे तंत्रज्ञान त्यांनी आयआयटी मद्रासच्या ग्रामीण तंत्रज्ञान व्यावसाय विभागाच्या सहकार्याने विकसित केले आहे. स्टेलॅप्सने स्वतःला केवळ एक अत्युच्च तंत्रज्ञान विकसित केलेली कंपनी म्हणून सिद्ध केले नाही, तर तीन वर्षांच्या काळात मोठे ग्राहक आणि योग्य वेळी निधी मिळवून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.
मार्केट आणि दृष्टिक्षेप
जगातील 16 टक्के दुग्ध उत्पादन भारतात होते. जगातील दोन तृतीयांश गोधन भारतात आहे, पण ते संघटित नाही, विखुरलेले आहे. भारतातील बहुसंख्य शेतकरी हे लघु आणि मध्यम स्वरुपातील दुग्ध व्यवसाय करतात.
वास्तविक डेअरी फार्मिंग हे अतिशय विशाल असे उद्योग क्षेत्र आहे. स्टेलॅप्सने या संदर्भातील अत्यंत सखोल असा अभ्यास देखील पूर्ण केलेला आहे. सध्या स्टेलॅप्सने लघु आणि मध्यम शेतकऱ्यांवर लक्ष्य केंद्रीत केलेले आहे. ज्यांच्याकडे साधारणपणे 5 ते 25 गायी आहेत, आणि ज्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतलेले नाही अश्यांसाठी दूध उत्पादन, त्यातील टप्पे आणि दूध मार्केटिंगसाठी स्टेलॅप्सकडे दर्जेदार आणि उत्तम उपाय आहेत. अन्य उद्योगांप्रमाणेच दूध उत्पादक शेतकरीसुद्धा आठ तासांहून अधिक काळ काम करुन देखील नफा मिळवू शकत नाहीत आणि म्हणूनच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन ज्ञानाधारित उपाय स्टेलॅप्सने शोधून काढलेले आहेत. ज्याद्वारे दूध उत्पादन प्रक्रिया सुधारुन गुराढोरांच्या आरोग्याकडेही लक्ष पुरवणे शक्य होते.
समस्या अचूकपणे समजावून घेणे
'गुरे' दूध उद्योगातील मध्यवर्ती घटक असल्याने त्यातील खालील घटकांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहेः
अ) आरोग्य
ब) अधिकाधिक उत्पादन क्षमता
क) अन्न, पाणी आणि आरोग्यपूर्ण निवारा
जर शेतकऱ्यांनी वरील तीन विषयांवर लक्ष्य केंद्रीत केल्यास डेअरी उद्योग नफा देणारा ठरेल.
पारंपरिकरित्या, डेअरी फार्मिंग हे मजूरांवर आधारलेला उद्योग म्हणून ओळखला जातो. खूप मजूर कामाला लावून अधिक दुग्ध उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, जेव्हापासून गोठ्यांमध्ये स्वच्छता, गुरांना योग्यवेळी अन्न पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला तेव्हापासून पारंपरिक प्रकार मागे पडले. दूध उत्पादन क्षेत्रात गोठवणूक यंत्रणा बसवणेही अधिक फायदेशीर ठरु लागले. यासाठी वीजेची गरज भासत असली तरीदेखील गायींच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती करुनही ही गरज सहजपणे भागवता येऊ शकते.
उत्पादने आणि तंत्रज्ञान
स्टेलॅप्सची उत्पादने संपूर्ण दूध उत्पादन प्रक्रिया उद्योग डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आली आहेत. मग त्यात अगदी पायाभूत सुविधा उभारण्यापासून गुरांच्या राहण्याच्या व्यवस्थेपर्यंतच्या बाबींचा समावेश आहे. वीजेची गरजेनुसार उभारणी करणे तसेच बायोगॅसच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याचा देखील समावेश आहे.
स्टेलॅप्सच्या उपयुक्त वस्तू अशा -
स्मार्टमू
'स्मार्टमू' ही डेअरी फार्म सेवांमधील सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता असलेली वस्तू म्हणता येईल. यात शुद्ध दूध उत्पादनासाठीचे सर्व नियम, उत्पादन क्षमता वाढीचे प्रयत्न, किफायतशिरपणा आणि योग्य वेळेत सर्व माहिती मिळण्याची सोय आहे. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
अॅटोमेटेड मिल्किंग सिस्टिम (स्मार्ट एएमएस)
बल्क मिल्क चिलिंग सिस्टिम (स्मार्ट बीएमसी)
फार्म उभारणीसाठीच्या सेवा (त्यात गायींसाठीचे पायाभूत सेवा, राहण्याची सोय, गायींची निवड, चारा ठेवण्याची सोय, खत प्रक्रिया प्रकल्प, गायींसाठीच्या आरोग्य सेवांचा समावेश आहे.)
फार्म ले-आऊट डिझाईन ऍण्ड मॉडेलिंग (गायींसाठीचे शेड, मिल्किंग पार्लर आणि कामगारांची निवासव्यवस्था)
उत्पादनवाढीसाठी आणि उत्पादनांच्या किफायतशीरपणासाठी सल्ला
वीज उपलब्ध नसलेल्या फार्मसाठी बायोगॅसची उभारणी
फार्म मॅनेजमेंट इक्विपमेंट्स
स्मार्टमूमध्ये खालील उत्पादनांचाही समावेश आहेः
स्मार्ट फार्म्सः हे फार्म्स क्लाऊड सिस्टिमवर आधारलेले आहेत. यात प्राण्यांचा आवाज रेकॉर्ड होऊन त्याद्वारे त्यांचे योग्य नियोजन केले जाते. यातून उत्पादनक्षमता, उत्पादनवाढ, प्रजनन, गुरांची आरोग्यविषयक काळजी, त्यांना योग्य अन्न-चारा पुरवले जाते.
स्मार्ट बीएमसीः ही अत्यंत आधुनिक अशी दूध थंड ठेवणारी यंत्रणा आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून ही यंत्रणा वापरता येते.
स्मार्ट एएमएसः ही स्वयंचलित मिल्किंग सिस्टिम आहे. तीन स्टेशन पार्लरपासून ते मोठ्या क्षमतेच्या पार्लरपर्यंत ही यंत्रणा विकसित करता येते. यात गायींची ओळख, स्वयंचलित मिल्क मीटर्स, दुधांचे नमुने गोळा करणे, अतिशय शुद्ध आणि सात्विक दुधाची निर्मिती करणे या माध्यमातून शक्य होते.
कोनट्रॅकः कोल्ड चेन हाताळणारी ही इंटरनेटवर आधारित यंत्रणा आहे. या माध्यमातून वस्तुस्थिती अहवाल, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करुन ते कोणीही बदलू शकणार नाही, अशा यंत्रणेची निर्मिती केली जाते. मोठ्या प्रमाणातील मिल्क कूलर्स आणि कोल्ड रुम्सची उभारणी करुन त्याचे नियंत्रण या माध्यमातून करता येते.
मूल्य आणि तंत्रज्ञान
डॅशबोर्ड स्मार्टमू
जगातील अन्य पुरवठादार कंपन्यांपेक्षा स्टेलॅप्सचे डेअरी फार्मिंग उत्पादनांचे मूल्य अतिशय कमी आहे. ते निर्धारित करत असलेल्या मूल्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासापासून ते दूध उत्पादन, दूध साठवणूक या सगळ्यांचा समावेश असतो. या संदर्भातील सगळे मूल्यमापन हे क्लाऊडमार्फत पार पडते. गुरे आणि चिलिंग सिस्टिमवर लावलेल्या सेंसर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी माहिती फक्त समजून घ्यावी लागेल. ती प्रसंगी पशुवैद्यकांपर्यंत पोहोचवावी लागेल. ही सगळी माहिती वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून स्टेलॅप्सच्या सर्व्हरपर्यंत येईल. विशेष म्हणजे शेतकरी ही सगळी माहिती ऍण्ड्रॉइड अॅप्स आणि डॅशबोर्डवरील स्मार्टमूच्या माध्यमातून ऍक्सेस करु शकतील.
डॅशबोर्ड स्मार्टमू
स्टेलॅप्सने त्यांच्या उद्योगाचे तत्वज्ञान सुरुवातीपासून पाळले आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांसोबत तुम्हाला तेव्हाच नफा मिळू शकतो जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काम कराल, आणि त्यातून शेतकऱ्यांनाही नफा मिळेल. स्टेलॅप्सचा नफा हा दुधाच्या दर लिटरमागे निश्चित केला जातो. अर्थात शेतकऱ्यांचा नफा हा त्यातूनच पुढे वाढत जातो. त्यामुळे यात शेतकऱ्यांना केवळ वरवर काहीतरी सांगण्याचा उद्देश अजिबात नाही.
स्टेलॅप्सच्या संस्थापकांची पार्श्वभूमी
स्टेलॅप्सचे संस्थापक- डावीकडून प्रवीण नळे, रंजीथ मुकुंदन, रामकृष्णा अदुकुरी, व्यंकटेश शेशास्यायी, रविशंकर शिरुर
रंजीथ मुकुंदन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. टेलिकॉम आणि सॉफ्टवेअरमधील अभियंता असलेल्या मुकुंदन यांनी विप्रोमध्ये सुमारे अडीचशे लोकांच्या टीमचे नेतृत्व केलेले आहे. सुमारे 17 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
रविशंकर शिरुर हे संचालक असून व्यवसायवृद्धी विभागाचे प्रमुख आहेत. आयआयटी मद्रासमधील ते पदवीधर आहेत. सॉफ्टवेअर आणि टेलिकॉम उद्योगातील सुमारे 20 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. स्ट्रॅटेजी सल्लागार म्हणून त्यांनी एटी ऍण्ड टी, टेल्स्ट्रा, नॉर्टेल, इरिकसन आणि अल्काटेल ल्यूसन्ट कंपनीतील कामाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.
प्रवीण नळे हे कंपनीचे संचालक असून चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत. ते देखील आयआयटी मद्रासचे पदवीधर आहेत. त्यांना देखील सुमारे 15 वर्षांहून अधिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनुभव आहे. सर्वसाधारणे आढळून न येणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील कॉम्बिनेशन त्यांच्याकडे आहे.
रामाकृष्णा अदुकुरी हे सॉफ्टवेअर सोल्यूशन विभागाचे प्रमुख आहेत. आयआयटी खरगपूरचे ते पदवीधर आहेत. त्यांना 15 वर्षांहून अधिक काळ टेलिकॉम आणि उद्योग वास्तुरचना क्षेत्रातील अनुभव आहे. युनिफाईड कम्युनिकेशन आणि क्लाऊड कंपनीत ते मुख्य वास्तुरचनाकार म्हणून कार्यरत होते.
व्यंकटेश शेशास्यायी हे डोमेन सोल्यूशन विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना देखील 15 वर्षांहून अधिक या क्षेत्रातील अनुभव आहे. एकाहून अधिक टेलिकॉम कंपन्यांच्या सेवा माध्यमातून सर्वांपर्यंत अचूक माहिती कशी पोहोचेल, याचे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
सर्वसामान्यांसाठी स्टेलॅप्सचे महत्त्व
किफायतशीर असे डेअरी फार्म सोल्यूशन्स :
पेटंट पेंडिग टेक्नॉलॉजीने नियंत्रित केलेले स्वयंचलित डेअरी सोल्यूशन्स भारतात जगाच्या तुलनेत स्वस्त उपलब्ध आहेत. भारत ही विकसित होणारी बाजारपेठ असल्याचे जाणून या किंमती त्याला साजेशा अर्थात परवडणाऱ्या ठेवण्यात आल्या आहेत.
कमी मूल्य कसे : दूध उत्पादनाशी संबंधित प्रक्रिया स्वयंचलित केल्याने किंमती कमी झाल्या आहेत. कामगारांवर अधिकाधिक अवलंबून राहणे कमी केल्यानेही उत्पादनांच्या किंमती कमी झाल्या. चाऱ्याचे योग्य, अचूक नियोजन केल्याने देखील प्रती लिटर दुध उत्पादनाचा खर्च कमी होतो. अवलंबित्व कमी कमी होत गेल्याने खर्चावरही नियंत्रण राहते.
गुरांच्या आरोग्याची काळजीः अतिप्रगत अशा क्लाऊड तंत्रज्ञानातून मिळत असलेल्या विश्लेषणामुळे गुरांच्या आरोग्याची काळजी आधीच घेतली जाते. गुरे आजारी पडण्याच्या घटना आधीच रोखल्या जाणे, यामुळे शक्य होते. त्याचा अर्थातच चांगला परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो.
उत्पादन क्षमतेतील वाढः प्रगत क्रिया मीटर आणि क्लाऊडवर आधारित अहवालामुळे वेळोवेळी अचूक योजना आखता येतात. प्रसंगी काही घटना टाळता येणेही शक्य होते. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षमता वाढण्यास सहाय्य होते.
मूल्यवृद्धीः डेटा रेकॉर्डिंग आणि वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या गुरांच्या आरोग्याच्या काळजीमुळे गुरांची विक्री करण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे मूल्य देखील आपोआपच वाढते.
विमा हप्त्यात कपातः सर्वसाधारणपणे गुरांचा विमा हप्ता हा वाढत जाणारा असतो. पण त्यांच्या आरोग्याची अचूक माहिती वेळोवेळी मिळत राहिल्याने विमा हप्ता न वाढता उलट किमान 50 टक्के कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
अत्युच्च दर्जाच्या दुधाची निर्मितीः नियंत्रित आणि कोणाकडून बदल करता येणार नाही, अशी कोल्ड चेन मॅनेजमेंट यंत्रणा विकसित केल्याने (उदा. रिमोट कंट्रोलने ऑपरेट होणारे बल्क मिल्क कूलर्स) दुधामधील जिवाणूंचे प्रमाण हे अत्यंत कमी होते. त्यातून निर्माण होणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे अत्युच्च दर्जाचे असतात.
स्टेलॅप्ससाठी मोलाच्या ठरणाऱ्या बाबीः
टीम स्टेलॅप्सचे श्रेय कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. त्यासाठी काही घटक निश्चित कारणीभूत आणि सहाय्यकारी ठरले आहेत. स्टेलॅप्समुळे अनेक दिग्गज उद्योजक शेती आणि डेअरी फार्मिंगकडे वळू शकतील. तसेच या क्षेत्रात असलेली संधी देखील त्यांना समजू शकेल.
संयमः स्टेलॅप्सचे सर्व संस्थापक आणि गुंतवणुकदारांना या क्षेत्रात तातडीने नफा-परतावा मिळणार नाही, याची पूर्ण माहिती आहे.
संस्थापकांची संख्या अधिक असणे हे देखील स्टेलॅप्सला उपयुक्त ठरले आहे. सुरुवातीच्या काळात स्थैर्य मिळण्यासाठी प्रत्येक संस्थापकाने त्यांच्या पगारातील किमान 20 ते 30 टक्के रक्कम (नोव्हेंबर 2010 ते ऑक्टोबर 2011) या उद्योगाच्या उभारणीसाठी दिली. शिवाय त्यांच्या एकत्रित अनुभव हा देखील स्टेलॅप्सच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरला.
कुटुंबाकडून मिळणारे पाठबळ आणि आयआयटी मद्रासच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाचे सहाय्य देखील मोलाचे ठरले.
वेळेचे महत्त्वः डेअरी उत्पादनाशी संबंधित तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात भारत जगाच्या तुलनेत प्रचंड मागे आहे. त्यामुळे हे अंतर दूर कऱण्यासाठी स्टेलॅप्सचे तंत्रज्ञान अत्यंत सहाय्यकारी ठरणारे आहे.
मार्केटचा प्रतिसादः आत्तापर्यंत तरी शेतकऱ्यांनी स्टेलॅप्सच्या उत्पादनांचे स्वागत केले आहे. भविष्याचा विचार करता स्टेलॅप्स हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनाही पटले आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच स्टेलॅप्सचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने होत आहे.
स्वच्छ, शुद्ध दुधासाठी सरकारचा निधी
कम्युनिटी पार्लर
तीन वर्षांच्या अत्यंत कमी कालावधीत स्टेलॅप्सने जगातील सर्वांत मोठे कम्युनिटी मिल्क पार्लर चिंतामणी तालुका (चिखाबल्लपूर जिल्हा) येथे उभारले आहे. तेथे दिवसाला 200 गायी दूध देतात. हे पार्लर स्टेलॅप्सच्या उज्ज्वलशाली भविष्याची जणू ग्वाही देणारे आहे.
आपण स्टेलॅप्सच्या तंत्रज्ञानाविषयी याआधी कधी ऐकले होते का? आपणही अशा प्रकारची संशोधनपूर्ण माहिती आमच्याशी शेअर करु शकता...ते आम्हाला निश्चितच आवडेल...

Image may contain: outdoor

Image may contain: bicycle and outdoor
Comment

गोठ्यात आहेत जातिवंत दुधाळ गाई

गोठ्यात आहेत जातिवंत दुधाळ गाई
पुणे शहरातील कावरे बंधू हे आइस्क्रीम उद्योगातील कुटुंब. या कुटुंबातील सुनील कावरे यांनी उद्योगाच्याबरोबरीने पशुपालनाकडेही तेवढेच लक्ष दिले आहे. होल्स्टिन फ्रिजीयन, जर्सी या गाईंच्या बरोबरीने जातिवंत साहिवाल गायही आहे. काटेकोर व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
‘‘आमचे आजोबा रामचंद्र कावरे यांनी १९२३ मध्ये पुणे शहरात पॉट आइस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर वडिलांनी हा व्यवसाय वाढविला. शनिवार पेठेत आमचा गाई-म्हशींचा गोठा होता; परंतु वाढत्या वस्तीमुळे हा गोठा आम्ही पुण्यापासून २७ किलोमीटर अंतरावरील आर्वी (ता. हवेली, जि. पुणे) या गावातील आमच्या शेतावर नेला. या ठिकाणी सहा एकर जमीन आहे. यामध्ये ४.५ एकरावर संकरित नेपिअर, मका लागवड आहे. एक एकर क्षेत्रावर दहा वर्षांची केसर आंबा कलमांची लागवड आहे. सख्खे- चुलत मिळून आम्ही अकरा भाऊ एकत्र असून व्यवसायाची जबाबदारी वाटून घेतलेली आहे. माझा भाऊ योगेश हा डेअरी टेक्नॉलॉजी झालेला आहे. त्यामुळे आइस्क्रीम उद्योग आणि पशू व्यवस्थापनात त्याची मदत होते. आम्ही सर्व जण राज्य तसेच परराज्यातील पशुप्रदर्शन, प्रयोगशील पशुपालकांच्या गोठ्याला भेटी देऊन नवीन तंत्रज्ञान तसेच जातिवंत जनावरांची माहिती घेतो. त्यातूनच पशुपालन व्यवसाय काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न असतो.... पशुपालनातील टप्पे सुनील कावरे सांगत होते.
आइस्क्रीम निर्मिती हा जरी मुख्य व्यवसाय असला तरी सुनील कावरे यांनी परंपरागत पशुपालन व्यवसायाकडेही चांगले लक्ष दिले आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की मी आणि मुलगा स्वप्नील शेती आणि गाई, म्हशींचे व्यवस्थापन पाहातो. सध्या गोठ्यात २५ होल्स्टिन फ्रिजीयन, सात जर्सी, सहा साहिवाल, एक फ्रिजवाल गाय, सहा म्हशी आणि पंधरा लहान वासरे अशी एकूण साठ जनावरे आहेत. गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हवेशीर गोठा बांधला आहे. तोंडाकडे तोंड या पद्धतीने गाईंना बांधले जाते. रोज सकाळी पाच वाजता स्वच्छता करून गोठा धुऊन प्रति गाईस १० किलो हिरवा, कोरडा चाऱ्याची कुट्टी आणि दूध उत्पादनानुसार गाईस पशुखाद्य दिले जाते. मजुरांकरवी गाईंच्या धारा काढल्या जातात. चारा संपल्यानंतर गव्हाण धुऊन त्यात पाणी सोडले जाते. साधारणपणे नऊ वाजता सर्व गाई गोठ्या शेजारी असलेल्या आंबा बागेतील मुक्त संचार गोठ्यात साडेतीनपर्यंत मोकळ्या सोडतो. बागेत फिरल्याने गाईंचे आरोग्य चांगले राहते. त्या जास्त वेळ रवंथ करतात. आंबा बागेतच शेण-मूत्र पडते. बागेतील माती सुपीक होण्यासाठी याची मदत होत आहे. दुपारी चार वाजता सर्व गाई गोठ्यात घेतल्या जातात. तत्पूर्वी गोठ्याची स्वच्छता करून प्रति गाय १० किलो चारा कुट्टी आणि पाच किलो आंबोण दिले जाते. आंबोणाबरोबरीने खनिज मिश्रण, कॅल्शिअम पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने देतो. साडेपाच वाजता धारा काढल्या जातात. गव्हाणीतील चारा, पशुखाद्य संपल्यानंतर गव्हाणीत पाणी भरले जाते. गाई गरजेनुसार पाणी पीत राहतात. त्यांच्यावर ताण येत नाही. गोठ्यात कोबा केलेला आहे, दुधाळ गाईंसाठी मॅट टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या सडाला त्रास होत नाही.
दूध उत्पादनात सातत्य -
गाईंच्या व्यवस्थापनाबाबत कावरे म्हणाले, की आमची आंबा बाग म्हणजे मुक्त संचार गोठा आहे, त्यामुळे गाई दिवसभर गोठ्यात फिरतात, आराम करतात, त्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. आजारी पडत नाहीत. दर चार महिन्यांनी पशुतज्ज्ञ डॉ. वासुदेव सिधये, डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण आणि आरोग्य तपासणी केली जाते. गरज असेल तरच औषधोपचार केले जातात. सध्या ३९ पैकी २२ गाई दुधात आहेत. होल्स्टिन फ्रिजीयन गाय प्रति दिन सोळा ते वीस लिटर दूध देते. या दुधाचे फॅट ३.४ आहे. जर्सी गाय प्रति दिन बारा ते चौदा लिटर दूध देते. या दुधाचे फॅट ४.५ आहे. सकाळी १२५ लिटर आणि सायंकाळी १२५ लिटर दूध उत्पादन होते. आम्ही १० वेतापर्यंत गाई गोठ्यात ठेवतो. कृत्रिम रेतनाचा अवलंब करतो. प्रत्येक गाईचे आरोग्य, दूध उत्पादन, कालवडींची नोंद ठेवली जाते. जातिवंत कालवडी न विकता गोठ्यातच वाढविल्या जातात, त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य आहे. ओळखीच्या पशुतज्ज्ञांच्याकडून मला फ्रिजवाल जातीची गाय मिळाली. ही गाय सध्या मला दिवसाला २० लिटर दूध देते. दुधाला पाच फॅट आहे. या गाईचे वैशिष्ट्य म्हणजे चांगली रोग प्रतिकारशक्ती, संकरित गाईंपेक्षा दुधाला चांगले फॅट आहे. उपलब्ध चाऱ्यातदेखील दूध उत्पादनात सातत्य राहते. गोठ्यात चार मुऱ्हा आणि दोन गावरान म्हशी आहेत. मुऱ्हा म्हशी दिवसाला १० लिटर दूध देतात. सध्या दोन म्हशी दुधात आहेत. या म्हशींना पुरेसे खाद्य, शिफारशीनुसार लसीकरण आणि औषधोपचार केले जातात. सध्या गोठ्यात दोन मुऱ्हा पारड्या तयार झाल्या आहेत. म्हशीचे दूध आइस्क्रीमसाठी वापरले जाते. जातिवंत दुधाळ गाई, म्हशी आमच्या गोठ्यात असल्याने आम्ही गोठ्याला सार्थक डेअरी हे नाव दिले आहे.
वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी साडेचार एकरांवर संकरित नेपिअर, मका लागवड आहे. ज्वारी कडबा, उसाचे वाढे विकत घेतो. काही प्रमाणात शेती बांधावर डोंगरी गवत उपलब्ध होते, त्यामुळे चारा खरेदीसाठी फारसा खर्च नाही. पशुखाद्य, मजुरी, आरोग्य व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता एका गाईमागे सरासरी प्रति दिन १२० ते १३० रुपये नफा शिल्लक राहतो. सर्व उत्पादित दूध आमच्याच आइस्क्रीम उद्योगात वापरतो. त्याचबरोबरीने इतर शेतकऱ्यांच्याकडून दररोज तीन हजार लिटर दुधाची खरेदी केली जाते.
गोठ्यात आहे जातिवंत साहिवाल....
संकरित गाईंच्या व्यवस्थापनाबरोबरीने सुनील कावरे यांनी तीन वर्षांपासून साहिवाल या देशी गोवंशाचे संवर्धन सुरू केले आहे. याबाबत ते म्हणाले, की साहिवाल या देशी गाईंची चांगली रोग प्रतिकारशक्ती, उपलब्ध चारा, खाद्य तसेच वाढत्या तापमानातही दूध उत्पादनात सातत्य आणि ग्राहकांकडून दुधाला असलेली मागणी लक्षात घेऊन मी साहिवाल गाईंचे संगोपन सुरू केले. मित्राच्या सहकार्याने पंजाबातून पहिल्या टप्प्यात जातिवंत चार गाई आणि एक वळू आणला. पुढील वर्षी दोन गाई आणल्या. सध्या गोठ्यात सहा गाई, दोन वळू आणि चार कालवडी आहेत. या गाईच्या दुधाचे फॅट ४.५ आहे. सध्या माझ्याकडील एक गाय दिवसाला १४ लिटर दूध देत आहे. संकरित गाईंपेक्षा या गाईंचा व्यवस्थापन खर्च कमी आहे. जातिवंत साहिवाल वळू असल्याने नैसर्गिक रेतन केले जाते. सध्या तीन गाई दुधात आणि तीन गाभण आहेत. रोजचे ३० ते ३२ लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यातील १५ लिटर दुधाचे आमच्या संयुक्त कुटुंबामध्ये वाटप होते. उरलेले दूध आइस्क्रीमसाठी वापरतो. येत्या काळात साहिवाल गाईंची संख्या वाढवून दुधाची स्वतंत्र विक्री करणार आहे.
गोठ्यातील पाणी थेट शेतात...
गोठा धुतलेले पाणी एका टाकीत साठवून ते मडपंपाच्या साहाय्याने थेट संकरित नेपिअर आणि मका पिकांना दिले जाते. त्यामुळे चाऱ्याचे सकस उत्पादन होते. शेणमिश्रित पाण्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. उपलब्ध होणारे शेणखत आंबा फळबाग आणि चारा पिकांसाठी वापरले जाते.
संपर्क - सुनील कावरे - ९४२२३२२६३४
अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..
Image may contain: horse, outdoor and nature
LikeShow More Reactions
Com

" श्री फोंडकण देवी "

निरोम गावाचे ग्रामदैवत म्हणजे ........" श्री फोंडकण देवी "
सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात दक्षिणेकडे निरोम हे गाव आहे. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेल्या निरोमची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. निरोम गावाचे ग्रामदैवत म्हणजे श्री फोंडकण देवी. श्री फोंडकण देवी हे जागृत देवस्थान मानले जाते. देवीचे मंदिर गावाच्या मधोमध सुरुंगाच्या रायीत निसर्गाच्या छायेत वसलेले आहे. गावातील घडी हे देवांचे पुजारी आहेत. गावातील बारा बलुतेदार व सर्व जातिधर्माचे लोक देवीची पूजा करतात. देवी नवसाला पावते अशी गावक-यांची धारणा आहे. गावात गांगो मंदिर, मोरेश्वर मंदिर, व आकारी ब्राम्हण मंदिर आहे. वर्षा‍तुन एक वेळ‍ हरि‍नाम सप्‍‍ताह अख्‍ांड हरि‍णाम वि‍ठ्ठल-रुक्मिणीच्‍या मंदि‍रात साजरा केला जातो. या वेळ‍ी गावचे लोक एकत्र येउन हा प‍ारंप‍ारि‍क उत्‍‍सवच मानुन साजरा करतात.ग्रामदैवतावर विश्वास असलेली माणसे असल्यामुळे सर्व जण गावच्या विकासासाठी झटताना दिसतात.निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्गाच्या डोंगर रांगातील एक छोटस गाव 'निरोम'. उंच डोंगर रांगा, सुंदर सुवासिक सुरुंग राई टुमदार घरे, सामाजिक एकोपा, मालवणी भाषा आणि कोंकणी बाज हि इथली प्रमुख वैशिष्टे.
'निरोम' हे गाव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गानजीक कणकवली पासून साधारणतः ३० कि. मि. अंतरावर वसलंय. ७०० ते ७५० घरे आणि गुण्यागोविंदाने नांदणारी ३००० लोकसंख्या. पावसाळी शेती हा मुख्य व्यवसाय, काजू फणस आणि हापूस आंबा यासठी प्रसिद्ध अश्या या मालवणी गावास नक्की भेट द्या …
Image may contain: indoor

दृष्टिक्षेपात तळगाव


रामेश्वराच्या कृपाछत्राखाली नांदणारे तळगाव....!!!
मालवण-कणकवली महामार्गापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर गर्द हिरवाईने नटलेले गाव म्हणजे तळगाव. श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी सातेरी यांच्या कृपाछत्राखाली नांदणारे तसेच खळखळणा-या कर्लीनदीच्या किनारी वसलेले गाव म्हणून तळगावची ओळख आहे. जाणकारांच्या सांगण्यानुसार तळगावात शिवकालीन सैन्यांनी तळ ठोकल्याने गावाला तळगाव हे नाव पडले. बारमाही शेती-बागायतीमुळे तळगाव हिरवाईने नटलेले दिसून येते. कट्टा - पाण्याच्या दृष्टीने तळगाव समृद्ध असून गावात भोवर, सुकेतळे व झरयाळा हे तीन तलाव प्रसिद्ध आहेत. तसेच गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोरच गावाची स्मशानभूमी आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात अशा प्रकारचे हे एकमेव देवस्थान आहे. शांतताप्रिय व ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तळगाव विकासाच्या वाटेवर घौडदौड करत आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत विविध योजना गावात राबवल्या गेल्यामुळे येथील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
स्वातंत्र्यकाळापूर्वी ताळगावात ग्रामपंचायतीची स्थापना झाली. पूर्वी येथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जात असे. परंतु, आधुनिकतेनुसार कलानुरूप हळूहळू सर्व गोष्टीत बदल होत गेला. गावात पक्के रस्ते, वाडीवाडीत जाणा-या सुसज्ज पायवाटा, आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक उपकेंद्र, शाळा यासोबत अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या. हळूहळू तळगाव विकासाचे टप्पे पार करत गेले. पूर्वीपासूनच शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे.गावातील शेतकरी, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शेती-बागायतीचे मळे फुलवलेले दिसतात. भात, कुळीथ, उडीद, नाचणी, भुईमूग, मका, चवळी, कलिंगड, सूर्यफूल इत्यादी उत्पादन शेतकरी घेत असल्याने अर्थाजनाचा मार्ग सुलभ झाला आहे. शेती बागायतीबरोबरच पशुपालन व दुग्धोत्पादन हा व्यवसायदेखील तळगावात तेजीत आहे. तळगावात १९९२ साली श्री रामेश्वर दुग्ध व्यवसाय दूध डेअरीची स्थापना करण्यात आली. या दूध डेअरीच्या चेअरमनपदी रामचंद्र दळवी व सेक्रेटरी हनुमंत दळवी कार्यरत आहेत. महिन्याभरातून सुमारे २५० ते ३०० लिटर दूध गावातील दूध डेअरीमधून निर्यात केले जाते. प्रामुख्याने शेती या प्रमुख व्यवसायामुळे तळगावात ख-या अर्थाने आर्थिक सुबत्ता आली आहे. गावची लोकसंख्या २,१०५ इतकी असून त्यापैकी १,१५० स्त्री तर ९५५ पुरुष संख्या आहे. यावरून तळगाव स्त्रीप्रधान असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच विद्यमान सरपंच शारदा पेडणेकर यांच्या रूपाने गावाला महिला सरपंच लाभल्या आहेत. तर त्यांच्यासोबत कार्यभार सांभाळण्यासाठी उपसरपंचपदी वनीता दळवी या कार्यभार सांभाळत आहेत.
श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी सातेरी हे गावातील प्रमुख देवस्थाने असून श्री दत्त मंदिर, श्री ब्राह्मणदेव, श्रीदेव गावडोबा, श्री देवी भवानी, श्री भोवर देव ही देवस्थाने प्रसिद्ध आहेत. तसेच बारापाचाच्या देवतांमध्ये हेमगिरी मठ, खांददारवळय़ा या ठिकाणी आहेत. तळगाव, खांद, पेडवे, म्हावळुंगे ही ४ गावे महसुली गावांमध्ये येतात. गावात एकूण १३ वाडय़ा असून यामध्ये देऊळवाडी, बौद्धवाडी, दारवळवाडी, खांदवाडी, पेडवेवाडी, काटापूरवाडी, देवारेवाडी, राणेवाडी, ब्राह्मणवाडी, शेळवणेवाडी, म्हावळुंगेवाडी, गावडेवाडी, रायवाडी, सुकळवाडी या वाडय़ांचा समावेश आहे. गावातील ग्रामस्थांमधील एकजूट व लोकप्रतिनिधींचे सहकार्य यामुळे २००० साली निर्मलग्राम पुरस्कार, २०१०-११ ते २०१२-१३ सलग तीन वष्रे पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच गावातील राणेवाडी या प्राथमिक शाळेला शैक्षणिक गुणवत्ता या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
तळगावातील अनेक मान्यवरांनी आमदार, मुंबईचे महापौर अशी पदे भूषवली आहेत. गावचे सुपुत्र संजय दळवी हे जिल्ह्यातील एक नामवंत भजनी कलाकार असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते भजन स्पर्धामध्ये परीक्षक म्हणून काम पाहतात. तळगावचे हित साधण्यासाठी गावातील प्रमुख व्यक्ती व ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन १९३५ साली तळगाव हितवर्धक संस्था स्थापन केली. त्याच माध्यमातून १९८३ साली श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगावची स्थापना करण्यात आली. या प्रशालेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गावात एकूण सहा प्राथमिक शाळा, सहा अंगणवाडय़ा, तळगाव विविध कार्यकारी सोसायटी संस्था, प्राथमिक उपकेंद्र कार्यरत आहेत. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी तळगाव गावचे पोस्ट ऑफिस आहे. तळगावात एकूण ३९ सार्वजनिक विहिरी असून नळपाणी योजना कार्यन्वित आहेत. लाभार्थी कुटुंब संस्था ५६२ असून सुमारे ६० कुटुंबांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे. तळगावात प्रामुख्याने श्रीदेव रामेश्वर जत्रोत्सव, शिमगोत्सव, महाशिवरात्र हे वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्याचबरोबर गावात दलीत वस्तीत सुसज्ज समाजमंदिर असून त्या ठिकाणी नवरात्रोत्सव, आंबेडकर जयंती, बौद्ध जयंती व इतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. गावात एकूण २० बचतगट कार्यरत आहेत. गावातील ग्रामस्थांचा संघटितपणा तसेच श्री देव रामेश्वराचा कृपाशीर्वाद व गावाचा कोकण रेल्वेसाठी असलेला खारीचा वाटा या गोष्टींमुळे आज तळगावात आर्थिक समृद्धी
नांदत आहे.
दृष्टिक्षेपात तळगाव..
ग्रा. पं. स्थापना : १९४१
वाडय़ा : १३
क्षेत्रफळ : ८८६ हेक्टर ३४ आर
पुरस्कार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम
पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार

प्राचीनकाळ[संपादन]

प्राचीनकाळ[संपादन]
नावाचा उगम[संपादन]
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. (पुरावा हवा!) अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. महाराष्ट्राचा इतिहास
पारधी-भिल्ल समाज[संपादन]
पहिले शेतकरी[संपादन]
मध्यपाषाणकालामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व ४०००मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरू झाली. महाराष्ट्रातील जोर्वे येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५००चे आहेत. या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चटयांपासून व मातीपासून बनवलेली असत. कोठारांत व कणगीत धान्य साठवत असत. स्वयंपाक दोन कोनी चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.
अश्ववाहक/राऊत समाज[संपादन]
पहिले नागरिकीकरण[संपादन]
मौर्य ते यादव[संपादन]
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)
मौर्य साम्राज्याचा काळ[संपादन]
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
सातवाहन साम्राज्याचा काळ[संपादन]
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटकांचा काळ[संपादन]
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
कलाचुरींचा काळ[संपादन]
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ[संपादन]
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.
वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ[संपादन]
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.
यादवांचा काळ[संपादन]
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य[संपादन]
अजिंठातल्या लेणी
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८मध्ये गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही चालू आहे. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहंमद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स.१३४७ तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बाहमनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.