गोठ्यात आहेत जातिवंत दुधाळ गाई
पुणे शहरातील कावरे बंधू हे आइस्क्रीम उद्योगातील कुटुंब. या कुटुंबातील सुनील कावरे यांनी उद्योगाच्याबरोबरीने पशुपालनाकडेही तेवढेच लक्ष दिले आहे. होल्स्टिन फ्रिजीयन, जर्सी या गाईंच्या बरोबरीने जातिवंत साहिवाल गायही आहे. काटेकोर व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
‘‘आमचे आजोबा रामचंद्र कावरे यांनी १९२३ मध्ये पुणे शहरात पॉट आइस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर वडिलांनी हा व्यवसाय वाढविला. शनिवार पेठेत आमचा गाई-म्हशींचा गोठा होता; परंतु वाढत्या वस्तीमुळे हा गोठा आम्ही पुण्यापासून २७ किलोमीटर अंतरावरील आर्वी (ता. हवेली, जि. पुणे) या गावातील आमच्या शेतावर नेला. या ठिकाणी सहा एकर जमीन आहे. यामध्ये ४.५ एकरावर संकरित नेपिअर, मका लागवड आहे. एक एकर क्षेत्रावर दहा वर्षांची केसर आंबा कलमांची लागवड आहे. सख्खे- चुलत मिळून आम्ही अकरा भाऊ एकत्र असून व्यवसायाची जबाबदारी वाटून घेतलेली आहे. माझा भाऊ योगेश हा डेअरी टेक्नॉलॉजी झालेला आहे. त्यामुळे आइस्क्रीम उद्योग आणि पशू व्यवस्थापनात त्याची मदत होते. आम्ही सर्व जण राज्य तसेच परराज्यातील पशुप्रदर्शन, प्रयोगशील पशुपालकांच्या गोठ्याला भेटी देऊन नवीन तंत्रज्ञान तसेच जातिवंत जनावरांची माहिती घेतो. त्यातूनच पशुपालन व्यवसाय काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न असतो.... पशुपालनातील टप्पे सुनील कावरे सांगत होते.
आइस्क्रीम निर्मिती हा जरी मुख्य व्यवसाय असला तरी सुनील कावरे यांनी परंपरागत पशुपालन व्यवसायाकडेही चांगले लक्ष दिले आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की मी आणि मुलगा स्वप्नील शेती आणि गाई, म्हशींचे व्यवस्थापन पाहातो. सध्या गोठ्यात २५ होल्स्टिन फ्रिजीयन, सात जर्सी, सहा साहिवाल, एक फ्रिजवाल गाय, सहा म्हशी आणि पंधरा लहान वासरे अशी एकूण साठ जनावरे आहेत. गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हवेशीर गोठा बांधला आहे. तोंडाकडे तोंड या पद्धतीने गाईंना बांधले जाते. रोज सकाळी पाच वाजता स्वच्छता करून गोठा धुऊन प्रति गाईस १० किलो हिरवा, कोरडा चाऱ्याची कुट्टी आणि दूध उत्पादनानुसार गाईस पशुखाद्य दिले जाते. मजुरांकरवी गाईंच्या धारा काढल्या जातात. चारा संपल्यानंतर गव्हाण धुऊन त्यात पाणी सोडले जाते. साधारणपणे नऊ वाजता सर्व गाई गोठ्या शेजारी असलेल्या आंबा बागेतील मुक्त संचार गोठ्यात साडेतीनपर्यंत मोकळ्या सोडतो. बागेत फिरल्याने गाईंचे आरोग्य चांगले राहते. त्या जास्त वेळ रवंथ करतात. आंबा बागेतच शेण-मूत्र पडते. बागेतील माती सुपीक होण्यासाठी याची मदत होत आहे. दुपारी चार वाजता सर्व गाई गोठ्यात घेतल्या जातात. तत्पूर्वी गोठ्याची स्वच्छता करून प्रति गाय १० किलो चारा कुट्टी आणि पाच किलो आंबोण दिले जाते. आंबोणाबरोबरीने खनिज मिश्रण, कॅल्शिअम पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने देतो. साडेपाच वाजता धारा काढल्या जातात. गव्हाणीतील चारा, पशुखाद्य संपल्यानंतर गव्हाणीत पाणी भरले जाते. गाई गरजेनुसार पाणी पीत राहतात. त्यांच्यावर ताण येत नाही. गोठ्यात कोबा केलेला आहे, दुधाळ गाईंसाठी मॅट टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या सडाला त्रास होत नाही.
दूध उत्पादनात सातत्य -
गाईंच्या व्यवस्थापनाबाबत कावरे म्हणाले, की आमची आंबा बाग म्हणजे मुक्त संचार गोठा आहे, त्यामुळे गाई दिवसभर गोठ्यात फिरतात, आराम करतात, त्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. आजारी पडत नाहीत. दर चार महिन्यांनी पशुतज्ज्ञ डॉ. वासुदेव सिधये, डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण आणि आरोग्य तपासणी केली जाते. गरज असेल तरच औषधोपचार केले जातात. सध्या ३९ पैकी २२ गाई दुधात आहेत. होल्स्टिन फ्रिजीयन गाय प्रति दिन सोळा ते वीस लिटर दूध देते. या दुधाचे फॅट ३.४ आहे. जर्सी गाय प्रति दिन बारा ते चौदा लिटर दूध देते. या दुधाचे फॅट ४.५ आहे. सकाळी १२५ लिटर आणि सायंकाळी १२५ लिटर दूध उत्पादन होते. आम्ही १० वेतापर्यंत गाई गोठ्यात ठेवतो. कृत्रिम रेतनाचा अवलंब करतो. प्रत्येक गाईचे आरोग्य, दूध उत्पादन, कालवडींची नोंद ठेवली जाते. जातिवंत कालवडी न विकता गोठ्यातच वाढविल्या जातात, त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य आहे. ओळखीच्या पशुतज्ज्ञांच्याकडून मला फ्रिजवाल जातीची गाय मिळाली. ही गाय सध्या मला दिवसाला २० लिटर दूध देते. दुधाला पाच फॅट आहे. या गाईचे वैशिष्ट्य म्हणजे चांगली रोग प्रतिकारशक्ती, संकरित गाईंपेक्षा दुधाला चांगले फॅट आहे. उपलब्ध चाऱ्यातदेखील दूध उत्पादनात सातत्य राहते. गोठ्यात चार मुऱ्हा आणि दोन गावरान म्हशी आहेत. मुऱ्हा म्हशी दिवसाला १० लिटर दूध देतात. सध्या दोन म्हशी दुधात आहेत. या म्हशींना पुरेसे खाद्य, शिफारशीनुसार लसीकरण आणि औषधोपचार केले जातात. सध्या गोठ्यात दोन मुऱ्हा पारड्या तयार झाल्या आहेत. म्हशीचे दूध आइस्क्रीमसाठी वापरले जाते. जातिवंत दुधाळ गाई, म्हशी आमच्या गोठ्यात असल्याने आम्ही गोठ्याला सार्थक डेअरी हे नाव दिले आहे.
वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी साडेचार एकरांवर संकरित नेपिअर, मका लागवड आहे. ज्वारी कडबा, उसाचे वाढे विकत घेतो. काही प्रमाणात शेती बांधावर डोंगरी गवत उपलब्ध होते, त्यामुळे चारा खरेदीसाठी फारसा खर्च नाही. पशुखाद्य, मजुरी, आरोग्य व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता एका गाईमागे सरासरी प्रति दिन १२० ते १३० रुपये नफा शिल्लक राहतो. सर्व उत्पादित दूध आमच्याच आइस्क्रीम उद्योगात वापरतो. त्याचबरोबरीने इतर शेतकऱ्यांच्याकडून दररोज तीन हजार लिटर दुधाची खरेदी केली जाते.
गोठ्यात आहे जातिवंत साहिवाल....
संकरित गाईंच्या व्यवस्थापनाबरोबरीने सुनील कावरे यांनी तीन वर्षांपासून साहिवाल या देशी गोवंशाचे संवर्धन सुरू केले आहे. याबाबत ते म्हणाले, की साहिवाल या देशी गाईंची चांगली रोग प्रतिकारशक्ती, उपलब्ध चारा, खाद्य तसेच वाढत्या तापमानातही दूध उत्पादनात सातत्य आणि ग्राहकांकडून दुधाला असलेली मागणी लक्षात घेऊन मी साहिवाल गाईंचे संगोपन सुरू केले. मित्राच्या सहकार्याने पंजाबातून पहिल्या टप्प्यात जातिवंत चार गाई आणि एक वळू आणला. पुढील वर्षी दोन गाई आणल्या. सध्या गोठ्यात सहा गाई, दोन वळू आणि चार कालवडी आहेत. या गाईच्या दुधाचे फॅट ४.५ आहे. सध्या माझ्याकडील एक गाय दिवसाला १४ लिटर दूध देत आहे. संकरित गाईंपेक्षा या गाईंचा व्यवस्थापन खर्च कमी आहे. जातिवंत साहिवाल वळू असल्याने नैसर्गिक रेतन केले जाते. सध्या तीन गाई दुधात आणि तीन गाभण आहेत. रोजचे ३० ते ३२ लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यातील १५ लिटर दुधाचे आमच्या संयुक्त कुटुंबामध्ये वाटप होते. उरलेले दूध आइस्क्रीमसाठी वापरतो. येत्या काळात साहिवाल गाईंची संख्या वाढवून दुधाची स्वतंत्र विक्री करणार आहे.
गोठ्यातील पाणी थेट शेतात...
गोठा धुतलेले पाणी एका टाकीत साठवून ते मडपंपाच्या साहाय्याने थेट संकरित नेपिअर आणि मका पिकांना दिले जाते. त्यामुळे चाऱ्याचे सकस उत्पादन होते. शेणमिश्रित पाण्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. उपलब्ध होणारे शेणखत आंबा फळबाग आणि चारा पिकांसाठी वापरले जाते.
संपर्क - सुनील कावरे - ९४२२३२२६३४
अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..

LikeShow More Reactions
Com
No comments:
Post a Comment