गांडूळखत कसे बनवावे ?
1. जागेची निवड:- जमीन समतल असावी पण व्हर्मीवाँश जमा करण्यासाठी जमीनला थोडा उतार असावा.
गांडूळ खत तयार करताना तापमान २५-३५ डिग्री पर्यंत मर्यादित ठेवावे लागते, त्यासाठी गांडूळबेड शक्यतो सावलीत उभारावा.
गांडूळबेडसाठी छप्पर असणे आवश्यक आहे.
गांडूळबेड उभारण्यासाठी वापरण्यात येणारा बांबू योग्य प्रतीचा घ्यावा व त्यास वाळवी प्रतिबंधक रंग द्यावा.
व्हर्मीवाँश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिली आहे, तेथे खड्डा करून व्हर्मीवाँश जमा करण्याचे नियोजन करावे.
2. गांडूळबेड कसा भरावा ?
बांबूच्या मदतीने उभा केलेल्या बेडमध्ये ५-६ इंच जाडीचा बाँयोवेस्ट(निसर्गात उपलब्ध असलेला जैविक कचरा) मटेरीअलचा थर लावावा. बाँयोवेस्ट मध्ये पालापाचोळा, काडीकचरा, वाळलेले गवत, उसाची पाचट, केळीचे खांब इ. येतात. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे
त्यांनतर या थरावर ५-६ इंच जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रिय खत याचा द्यावा.
त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, अशाच पद्धतीने बेडच्या उंचीपर्यंत थर एकापाठोपाठ लावावे.
गांडूळबेडमध्ये गांडूळ टाकण्याअगोदर बेडवर चार दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल.
1 बेडवर 1 kg या प्रमाणात गांडूळ बेडवर सोडावेत.
सर्व थर लावल्यानंतर त्यावर गोणपाट अंथरावे.
चांगल्या प्रतीचे गांडूळखत मिळण्यासाठी ४५-६० दिवस लागतात. या दिवसांत गांडूळ बेडवर दिवसातून दोन वेळा पाणी शिंपडावे.
3. गांडूळखत वेगळे करण्याची पद्धत:
गांडूळखत आणि गांडूळ वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर खताचे ढीग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाशी जातील व गांडूळ आणि गांडूळखत वेगळे करता येईल.
शक्यतो गांडूळखत वेगळे करताना कुडळी, टिकाव, फावडे, खुरपे यांचा वापर करू नये. जेणेकरून गांडूळांना इजा पोहचणार नाही.
याव्यतिरिक्त दुसऱ्या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळ खताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे.
या गांडूळ खतामध्ये गांडूळाची अंडी, त्याची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे खत शेतामध्ये वापरता येते.
निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रतिवर्ष जमिनीत टाकावे.
4. व्हर्मीवाँश जमवण्याची पद्धत:
बेडच्या एका बाजूला व्हर्मीवाँश जमा करण्याची विशिष्ट सोय दिलेली आहे.
गांडूळबेड उभारल्यानंतर १० दिवसांनंतर व्हर्मीवाँश जमा करण्यास सुरुवात करावी.
व्हर्मीवाँश जमा करण्याजागी एक बादली कायम असू द्यावी.
गांडूळ शरीरातून सतत ‘ कोलाँमिक फ्लुइड ’ नावाचा पिवळसर स्राव बाहेर सोडत असतो. हा स्राव वंगणाचे काम करतो. त्यामुळे गांडूळाची हालचाल सुलभ होते.
ह्या स्रावात बुरशीनाशक गुणधर्म असतात.
सदर स्रावात नत्र-१.३२�स्फुरद-०.७२� पालाश-०.६५�सते. शिवाय पीकवाढीस लागणारी इतर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा असतात.
5. व्हर्मीवाँश वापरण्याचे फायदे:
पिकावरील बुरशीचा नाश होतो.
नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात असल्यामुळे पिक जोमदार वाढते.
किटकनाशकावरील व खताचा खर्च कमी होतो.
घरगुती द्रव्य बाजारभावापेक्षा ९० टक्क्यांनी स्वस्त पडते.
व्हर्मीवाँश सर्वत्र वापरता येते. सर्वसाधारणपणे पिकाच्या वाढीच्या कालावधीत व्हर्मीवाँशच्या दोन फवारण्यामधील अंतर १० ते १५ दिवसाचे असावे. हंगामी पिकासाठी ३ ते ४ फवारण्या तर वार्षिक पिकासाठी ५ ते ६ फवारण्या कराव्यात.
व्हर्मीवाँशच्या फवारणीमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्याचा वापर वरचेवर केला तरी चालतो.
कृपया हा संदेश सर्व शेतकरी बांधवा पर्यंत पोहचवा.
धन्यवाद
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ
अधुनिक शेतीला पर्याय नाही.
No comments:
Post a Comment