Wednesday, 27 December 2017

●असे ओळखा जनावराचे वय

ओळखा जनावरांचे योग्य वय●

जनावरांची खरेदी-विक्री, विमा उतरवताना तसेच जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करताना वय लक्षात घेतले जाते. यासाठी जनावरांचे वय कसे ओळखायचे याबाबतची माहिती पशुपालकांना निश्चितपणे उपयोगी ठरेल.

जनावरे खरेदी करताना त्यांची आनुवंशिकता, दुग्धोत्पादन तसेच त्यांच्यापासून आपल्याला किती वेत मिळतील याची माहिती करून घेणे जरुरी आहे. याचबरोबरीने जनावरांचे सद्यपरिस्थितीतील नेमके वय किती, हेदेखील ओळखता येणे महत्त्वाचे ठरते.

●असे ओळखा जनावराचे वय●

1) जनावरांच्या बाहेरील दिसण्यावरून वय ओळखणे -

लहान वयातील जनावरांची कातडी सतेज आणि चकचकीत असते, केस मऊ असतात, जनावर सुदृढ दिसते, खूर लहान आणि गोलाकार वाढलेले दिसतात. याउलट वयस्क जनावरांची हाडे मोठी दिसतात, कातडी ओघळलेले दिसते, त्यांची कातडी निस्तेज आणि चकाकी नसल्यासारखी दिसते. पायांची खुरे खूप वाढलेली दिसतात.

2) जनावरांच्या शिंगांच्या वर्तुळावरून वय
ओळखणे -

आपल्याकडे जनावराचे वय शिंगांवरून अथवा दातांवरून आजमवतात. जनावरांच्या शिंगांवर त्याच्या वयाप्रमाणे वर्तुळे अथवा "रिंग' तयार होतात. जन्मापासून दोन ते अडीच वर्षात शिंगांभोवती पहिले वर्तुळ दिसते. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे शिंगांभोवती वर्तुळे तयार होतात. वर्तुळांच्या संख्येत दोन ते अडीच संख्या मिळवून जनावरांचे वय ठरविता येते. परंतु बेंदूर, बैलपोळा सण तसेच जनावरांची खरेदी-विक्री करतेवेळी शिंगे चांगली दिसण्यासाठी ती कोयत्याच्या अथवा विळ्याच्या साहाय्याने तासली जातात. यामुळे शिंगांवरील वर्तुळे नाहीशी होऊन शिंगांवरून जनावरांचे वय ओळखणे अवघड जाते.
3) जनावरांच्या दातांवरून वय ओळख��

No comments:

Post a Comment