Wednesday, 27 December 2017

*_ऊसावरील रोग -चाबूक काणी_*

*​​​🌾आम्ही शेतकरी🌾​​​*

*_ऊसावरील रोग -चाबूक काणी_*

1) हा रोग युस्टिलॅगो स्किटॅमिनी नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतो.
2) रोगग्रस्त उसाच्या पोग्यांमधून चाबकासारखा, चंदेरी आवरण असणारा, 1-1.5 मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यात असलेली काळी पावडर म्हणजे याबुरशीचे असंख्य बीजाणू असतात.
3) हे बीजाणू बेणे, हवा व जमिनीद्वारापसरतात. अनुकूल परिस्थिती मिळाल्यावर बीजाणू रुजून बुरशीची वाढ होते. बुरशीखोडाच्या आंतरभागात प्रवेश करून चाबूक काणीच्या स्वरूपात रोगनिर्मितीकरते.
4) रोगामुळे पाने अरुंद व लहान दिसतात, उसाची जाडी वाढत नाही. ऊसआतून पोकळ होऊन वजनात घट येते. अशा उसाचा रस निकृष्ट दर्जाचा असून, साखरेचे प्रमाणही कमी होते.
रोगाच्या वाढीस कारणीभूत घटक

वनस्पतीच्य भागावर किवा जमिनीत असलेल्या रोगाच्या टेलीओस्पोअर बीजाणूची उगवण पाण्याची उपलब्धताझाली कि लगेच होते.

रोगाचाप्राथमिक प्रसार रोगग्रस्तबियाणे मार्फत होतो तर द्वितीयप्रसारहवामार्फात होतो.जमिनीवर असलेले बीजाणू पाण्यामार्फत पसरतात.

या बुरशी च्या वाढीसाठी व जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते.

No comments:

Post a Comment